loading...

चालू घडामोडी 14 जून 2018

loading...
✓मानवी हक्कांच्या उल्लंघन प्रकरणी ICJ कडे कतारने UAE विरुद्ध खटला दाखल केला :
कतार सरकारने संयुक्त अरब अमिरात (UAE) विरुद्ध मानवी हक्कांच्या उल्लंघन झाल्या प्रकरणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे (ICJ) खटला दाखल केला आहे.

वर्षभरापूर्वी कतार "दहशतवाद"ला समर्थन देत असल्याचा आरोप केला गेला होता. हा आरोप करत संयुक्त अरब अमिरात (UAE), सौदी अरेबिया, बहरीन आणि इजिप्त यांनी आपले राजकीय व व्यापारी संबंध निलंबित केले होते. त्यावेळी प्रभावित झालेल्या कतारने न्याय मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे धाव घेतली.

आंतरराष्ट्रीय न्यायालय (ICJ) ही 1945 साली स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची प्रधान न्यायिक संस्था आहे आणि हेग (नेदरलँड) शहरात याचे खंडपीठ आहे. ICJ मध्ये 15 न्यायाधीश असतात आणि या पदाचा कार्यकाळ 9 वर्षांचा असतो. ICJ निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवाराला संयुक्त राष्ट्रसंघ आमसभा (UNGA) आणि संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (UNSC) या दोघांकडूनही बहुमत असणे आवश्यक असते. ICJ च्या 15 सदस्यीय खंडपीठाचा एक तृतियांश भाग 9 वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक तीन वर्षात निवडण्यात येतो.

✓९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य:
स्थळ :-मुलुंड संमेलनाचे उद्घाटक :- सतीश आळेकर  संमेलनाच्या अध्यक्षा :-कीर्ती शिलेदार

राज्याच्या कृषी क्षेत्राला कॅनडाचा सहकार्य :
कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्‍युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने 12 जून रोजी महत्त्वपूर्ण यश मिळवले.

आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्‍स्ट एआय आणि एफआरक्‍यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून, राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्‍लस्टर्सची उभारणी होणार आहे.

कॅनडामधील मॉन्ट्रिएल येथे क्‍युबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड आणि मुख्यमंत्री यांच्यात 'आर्टिफिशियल इंटिलिजन्स' या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांत वापर करण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात घेतलेल्या भरारीची श्रीमती अँग्लेड यांनी प्रशंसाही केली.

क्‍युबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली 'एफआरक्‍यूएनटी' संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्‍युबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे.

विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार प्रदान :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दिला जाणारा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार अर्थात पॉली उम्रीगर पुरस्कार 12 जून रोजी विराट कोहलीला प्रदान करण्यात आला.

कोहलीला 2016-17 आणि 2017-18 या दोन्ही वर्षांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटरचा पुरस्कार मिळाला असून विराटला एकूण 30 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात 2016-17 आणि 2017-18 वर्षांसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यात विराट कोहलीला दोन्ही मोसमांसाठी सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

तर महिलांमध्ये हरमनप्रीत कौरला 2016-17 साठी आणि स्मृती मंधानाला 2017-18 या मोसमातील कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. 12 जून रोजी बेंगळुरु येथील कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विराट कोहलीला रवी शास्त्री यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले.

नाशिकमध्ये होणार 'डिफेन्स इनोव्हेशन हब' :
संरक्षण आणि हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून कोईमतूरपाठोपाठ नाशिकमध्ये 'डिफेन्स इनोव्हेशन हब' होईल, असे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी सांगितले.

राज्यात 'डिफेन्स हब'ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल 15 जून रोजी चर्चासत्र होत आहे. त्यासंबंधीची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते.

सार्वजनिक उद्योग, स्टार्टअप, वैयक्तिक इनोव्हेटर्स, संशोधन आणि विकास संस्थांसाठी संरक्षण इनोव्हेशन हबच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होईल. संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्राशी निगडित उद्योगांमधून 40 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादन होते.

उरलेले 'आउटसोर्स' करण्यात येते. त्यादृष्टीने छोटे उद्योजक तयार व्हायला हवेत म्हणून संरक्षण 'इको सिस्टीम'चे राबवण्यात येते. इनोव्हेशन हबसाठी सरकारतर्फे निधी उपलब्ध करून दिला जातो.

जेणेकरून संशोधन आणि विकासातून पुढे येणाऱ्या बाबी भारतीय संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील.

'इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्‍सलन्स' योजनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. योजनेसाठी 'डिफेन्स इनोव्हेशन ऑर्गनायझेशन'चा निधी दिला जातो, असेही त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेची उद्योगसंकुले उभारणार :
कृषी तंत्रज्ञान, मृदा व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर वाढविण्याबरोबरच या क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्स्ट एआय आणि एफआरक्यूएनटी संस्थांच्या सहकार्याने महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची उद्योगसंकुले (क्लस्टर्स) उभारण्यात येणार आहेत.

कॅनडाच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॉन्ट्रिएल येथे क्युबेकच्या उपपंतप्रधान डॉमनिक अँग्लेड यांची भेट घेतली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रात वापर करण्याबाबत त्यांच्यात विचारविनिमय झाला. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या कामगिरीची अँग्लेड यांनी प्रशंसा केली.

क्युबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली 'एफआरक्यू एनटी' संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्युबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारावेळी 'एफआरक्यूएनटी'चे रेमी क्युरिऑन उपस्थित होते. या करारानुसार कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यासगट स्थापन करण्यात येणार आहे.

तसेच या अभ्यासगटाच्या माध्यमातून कीड निर्मूलन, कृषी तंत्रज्ञान आणि माती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नेक्स्ट एआय संस्थेसह सामंजस्य करार करण्यात आला.

'नेक्स्ट एआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शेल्डोन लेव्ही यावेळी उपस्थित होते. राज्यातील 50 स्टार्टअप्सना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत नेक्स्ट एआय ही संस्था काम करणार आहे.

काही महत्वाच्या घटना:
२००१ ए. सी. किंवा डी. सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाले.
१९७२ डी. डी. टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
१९६७ चीनने पहिल्या ’हायड्रोजन बॉम्ब’ ची चाचणी केली.
१९४५ भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर
१९४० जर्मनीने पॅरिस ताब्यात घेतल्यामुळे दोस्त राष्ट्रांनी तिथुन माघार घेतली.
१८९६ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ’अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली. यातुनच पुढे कर्वे स्त्री शिक्षण संस्था, एस. एन. डी. टी. विद्यापीठ असे मोठमोठे उपक्रम सुरू झाले.
१७८९ मक्यापासुन पहिल्यांदाच ’व्हिस्की’ तयार करण्यात आली. तिला ’बोर्बोन’ असे नाव देण्यात आले कारण तयार करणारा रेव्हरंड क्रेग हा केंटुकी प्रांतातील ’बोर्बोन’ येथील रहिवासी होता.
१७७७ अमेरिकेने ’स्टार्स अँड स्ट्राइप्स’ या ध्वजाचा स्वीकार केला.
१७०४ मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले

जन्म :
१९६९ स्टेफी ग्राफ – जर्मन लॉन टेनिस खेळाडू
१९२२ के. असिफ – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक (मृत्यू: ९ मार्च १९७१)
१८६८ कार्ल लॅन्ड्स्टायनर – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ जून १९४३)
१८६४ अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (मृत्यू: १९ डिसेंबर १९१५)
१७३६ चार्ल्स कुलोम – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ ऑगस्ट १८०६)

मृत्यू :
 २०१० मनोहर माळगावकर – इंग्रजी लेखक (जन्म: १२ जुलै १९१३)
२००७ कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (जन्म: २१ डिसेंबर १९१८)
१९८९ सुहासिनी मुळगांवकर – अभिनेत्री व संस्कृत पंडित, मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. ३१ जानेवारी १९६० रोजी ’सौभद्र’ नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी विक्रमी ५०० प्रयोग केले. (जन्म: ????)
१९४६ जॉन लोगे बेअर्ड – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी (Television) चे संशोधक (जन्म: १३ ऑगस्ट १८८८)
१९२० मॅक्स वेबर – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ (जन्म: २१ एप्रिल १८६४)
१९१६ गोविंद बल्लाळ देवल – आद्य मराठी नाटककार, स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५५)
१८२५ पिअर चार्ल्स एल्फांट – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता (जन्म: ९ ऑगस्ट १७५४)

Post a Comment

0 Comments