loading...

चालू घडामोडी 4 जून 2018

loading...
आता डेन्मार्कमध्येही बुरखा, निकाब घालण्यावर बंदी
अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे.
अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा मंजूर केला आहे. मानवी हक्क कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे. असा कायदा करण्याची आवश्यकता नव्हती असे मानवी हक्क कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

डेन्मार्कच्या संसदेत गुरुवारी बुरखा आणि निकाब बंदीचे विधेयक ७५ विरुद्ध ३० मतांनी मंजूर झाले. कुठल्याही धर्माला लक्ष्य करण्याचा आपला हेतू नाही असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डोक्याला बांधायचा स्कार्फ, पगडी आणि पारंपारिक ज्यू टोपीवर बंदी घालण्यात आलेली नाही. डेन्मार्कमध्ये काही मुस्लिम महिला संपूर्ण शरीर आणि चेहरा झाकणारी वस्त्रे परिधान करत होती. या निर्णयामुळे यापुढे डेन्मार्कमध्ये मुस्लिम महिलांना बुरखा आणि निकाब परिधान करता येणार नाही.

येत्या १ ऑगस्टपासून डेन्मार्कमध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे. या कायद्याची कशी अंमलबजावणी करायची ते पोलिसांवर अवलंबून आहे असा डेन्मार्कचे न्यायमंत्री सोरेन पोयुलसेन यांनी सांगितले. या कायद्यानुसार योग्य कारण असेल तर लोकांना त्यांचा चेहरा झाकून ठेवण्याची परवानगी आहे. उदहारणार्थ कडाक्याची थंडी, बाईक चालवताना लोकांना त्यांचा चेहरा झाकता येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १हजार क्रोनर (डेन्मार्क चलन) दंड ठोठावण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमाचे उल्लंघन करताना पकडले तर १० हजार क्रोनरचा दंड किंवा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
✓साहसी पर्यटनासंदर्भात प्रथमच दिशानिर्देश जाहीर
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रथमच देशामध्ये साहसी पर्यटनासंदर्भात दिशानिर्देश जाहीर करण्यात आलेली आहेत.

हे दिशानिर्देश भारतीय साहसी सहली ऑपरेटर संघ (ATOAI) यांच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहेत. ही मार्गदर्शके पर्वतारोहण, ट्रेकिंग, बंगी जंपिंग, पॅराग्लायडिंग, कयाकिंग, स्कूबा डायविंग, स्नॉर्कलिंग, रिव्हर राफ्टिंग आणि अन्य खेळ अश्या कार्यक्रमांचा समावेश असलेल्या भू, हवाई आणि जलक्रिडा यांमध्ये सुरक्षितता बाळगण्यासाठी आहेत.

✓केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी जम्मू-काश्मीरचा ‘देविका नदी’ पुनरुज्जीवन प्रकल्पाचा प्रस्ताव
जम्मू व काश्मीर राज्य शासनाने सुमारे 189.22 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या देविका नदीपुनरुज्जीवन प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र शासनापूढे मंजुरीसाठी मांडला आहे.

हिंदू ग्रंथानुसार देविका नदीला गंगा नदीची बहीण मानले जाते, जी ‘देविका नगरी’ या नावानेही ओळखली जाते. या नदीचा उगम उधमपूर जिल्ह्यात पर्वतावरील शुध्द महादेव मंदिरापासून होतो आणि पश्चिम पंजाबच्या (आता पाकिस्तानमध्ये) दिशेनी वाहते, जिथे ती पुढे रावी नदीत विलीन होते.

✓स्पॅम कॉल, SMS मर्यादित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करावा: TRAI
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) ‘टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कंज्यूमर प्रिफरन्स रेग्युलेशन-2018’ चा मसुदा जाहीर केला आहे. नव्या दिशानिर्देशकानुसार स्पॅम कॉल, SMS मर्यादित करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सुचना दिली गेली आहे.

TRAI ने नियंत्रित करणार्‍या सँडबॉक्स पद्धतीमधील प्रस्तावित कार्यचौकट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एक सुरक्षित वातावरण आहे, ज्यात काही नियम शिथील केले जाऊ शकतात आणि त्यावर उपाययोजना करता येतात.

हिमाचल प्रदेश शासनाची 'प्राकृतिक खेती खुशहाल किसान योजना'
28 मे 2018 रोजी हिमाचल प्रदेश राज्य शासनाने राज्याच्या 'प्राकृतिक खेती खुशहाल किसान योजना' याचा शुभारंभ केला आहे.

शून्य खर्चासह नैसर्गिकरीत्या शेती करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.

यामार्फत राज्यात जमिनीची उत्पादकता वाढविण्यासाठी औद्योगिक खतांचा आणि रसायनांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. तसेच पाण्याची उपलब्धता वाढविण्यावर भर दिला जाईल.

अॅलिसिया पुचेता: पराग्वेच्या प्रथम महिला राष्ट्रपती
पराग्वेच्या उपराष्ट्रपती अॅलिसिया पुचेता (68 वर्षीय) यांच्याकडे पराग्वेच्या राष्ट्रपती पदाची जबाबदारी तात्पुरती सोपविण्यात येणार आहे. वर्तमान होरॅसियो कार्टेस यांच्या राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर पुचेता पद सांभाळणार आहेत.
या नियुक्तीसोबतच, पराग्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे.

पराग्वे हा अर्जेंटिना, ब्राझील आणि बोलिव्हिया या देशांच्या सीमा लाभलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. दक्षिण अमेरिका खंडामध्ये हा देश आहे.

भारतीय नौदलाची ‘देओतीब्बा पर्वत मोहीम’
हिमाचल प्रदेशातील देओतीब्बा  (6001 मीटर) पर्वतावर चढाई करण्यासाठी सर्व स्त्री सदस्य सहभागी असलेल्या एका चमूसाठी भारतीय नौदलाने एक मोहीम आयोजित केली आहे.
28 मे ते 15 जून 2018 पर्यंत चालणार्या या मोहिमेसाठी लेफ्टनंट कमांडर कोकीला सजवान यांच्या नेतृत्वाखाली 15 साथीदारांची चमू तयार करण्यात आला आहे.

काही महत्वाच्या घटना : 
२००१ राजवाड्यात झालेल्या हत्यासत्रानंतर नेपाळचे राजे ग्यानेंद्र गादीवर बसले.
१९९७ इन्सॅट-२डी’ या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेन्च गयानातील कोऊरू येथून यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९९४ गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर.
१९९४ वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने ८ डावांत ७ शतके ठोकून नवा विक्रम प्रस्थापित केला.
१९९३ आय. एन. एस. म्हैसुर या युद्धविनाशकेचे जलावतरण
१९७९ घानामधे लष्करी उठाव
१९७० टोंगाला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४४ दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी रोम जिंकले.
१८९६ हेन्‍री फोर्डने तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे रस्त्यावर यशस्वी परीक्षण करण्यात आले.
१६७४ राज्याभिषेकापुर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकीलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे ७३ किलो भरले.

जन्म : 
१९७५ अँजेलिना जोली – अमेरिकन अभिनेत्री
१९४७ अशोक सराफ – विनोदी अभिनेता
१९४६ एस. पी. बालसुब्रम्हण्यम – दाक्षिणात्य चित्रपटातील गायक, चित्रपट अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार विजेते
१९३६ नूतन बहल – चित्रपट अभिनेत्री (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९९१)
१७३८ जॉर्ज (तिसरा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २९ जानेवारी १८२०)

Post a Comment

0 Comments