loading...

चालू घडामोडी 25 जून 2018

loading...
शनी २७ जूनला येणार पृथ्वीजवळ :
अमरावती : सूर्यमालेतील विलोभनीय कडा असणारा शनी ग्रह २७ जून रोजी पृथ्वीच्या खूपच जवळ येणार आहे. या दिवशी हा ग्रह अगदी सूर्यासमोर राहील. या घटनेला खगोलशास्त्रात प्रतियुती असे म्हणतात. प्रतियुतीच्या आसपास पृथ्वी-शनी हे अंतर सरासरी कमी असते. त्यामुळे या काळात शनीची सुप्रसिद्ध सुंदर कडा अतिशय सुंदर दिसते. मात्र, साध्या डोळ्यांनी ती दिसणार नाही.

शनी-सूर्य प्रतियुती यापूर्वी १५ जून २०१७ रोजी झाली होती. शनीला एकूण ६२ चंद्र असून, सर्वांत मोठा टायटन आहे. शनिला सूर्याभोवती एक फेरी मारण्यास २९.५ वर्षे लागतात. या ग्रहाचा व्यास १,२०,००० कि.मी. आहे. २७ जून रोजी सूर्य मावळल्यावर लगेच शनि ग्रह पूर्व क्षितिजावर उगवेल व पहाटे पश्चिम क्षितिजावर मावळेल. तो रात्रभर आकाशात दिसेल.

काळसर व पिंगट रंगाचा अगदी चमकदार असल्याने तो सहज ओळखता येईल. परंतु, त्याची कडा पाहण्याकरिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे.

यानंतर ९ जुलै २०१९ रोजी तो पृथ्वीच्या जवळ राहील. या दिवशी पृथ्वी-शनी हे अंतर १३५ कोटी १० लक्ष कि.मी. राहील, अशी माहिती अमरावती एस.आर.पी. कॅम्प स्थित हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी दिली.
हरियाणा राज्य शासनाची ‘7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना’ :
जानेवारी 2018 मध्ये हरियाणा राज्य शासनाने राज्यात ‘7-स्टार ग्राम पंचायत रेनबो योजना’ लागू केली. या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 1120 गावांना स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. यासोबतच, सात सामाजिक मापदंडांच्या आधारावर ग्रामपंचायतींना स्टार मानांकन देणारा हरियाणा देशातला पहिला राज्य ठरला आहे.

भारत स्मार्ट शहर पुरस्कार 2018 :
भारत स्मार्ट शहर पुरस्कार (India Smart Cities Award) अंतर्गत तीन श्रेणींमध्ये एकूण नऊ पुरस्कारांची घोषणा केली गेली आहे. हे पुरस्कार प्रकल्प पुरस्कार, अभिनव कल्पना पुरस्कार आणि शहर पुरस्कार या श्रेणींमध्ये दिले जात आहे.

शहर पुरस्कार – सूरत (गुजरात) :
 विशेषत: शहरी पर्यावरण, वाहतूक आणि गतिशीलता आणि शाश्वत एकात्मिक विकासाच्या श्रेणीत प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये दाखविलेल्या जोमासाठी शहर पुरस्कार दिला जात आहे.

अभिनव कल्पना पुरस्कार :
भोपाळ (मध्यप्रदेश) आणि अहमदाबाद (गुजरात)  शाश्वत एकात्मिक विकासाच्या यशप्राप्तीसाठी अभिनवता, तळागळापर्यंत संपर्क आणि परिवर्तनीय अश्या दृष्टिकोनासाठीचे उल्लेखनीय प्रकल्प / कल्पनांना अभिनव कल्पना पुरस्कार दिला जात आहे.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, प्रविण तोगडियांची नवी संघटना :
विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी झाल्यानंतर प्रवीण तोगडिया अधिक आक्रमक झालेले दिसून येत आहेत. आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रवीण तोगडियांनी आपल्या नवीव संघटनेची स्थापना केली आहे. ‘आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद’ असे या संघटनेचे नाव आहे.

ही संघटना प्रमुख्याने धार्मिक आणि सामाजिक कामांसाठी चालवली जाणार आहे.

14 एप्रिल रोजी विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्यापासूनच तोगडिया नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी व्यक्त केली आहे. प्रसंगी त्यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्त्वावरही आपला निशाणा साधण्याचे सोडले नाही.

कोकजे सध्या विहिंपचे अध्यक्ष :
विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी सध्या विष्णू सदाशिव कोकजे विजयी झाले आहेत. विष्णू सदाशिव कोकजे हे हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल आहेत.

तब्बल 52 वर्षांनी झालेल्या निवडणुकीत आज कोकजे 131 मतांनी निवडून आले आहेत. या निवडणुकीत एकूण 273 प्रतिनिधींपैकी 192 प्रतिनिधींनी मतदान केलं. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून विहिंपचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या प्रविण तोगडिया यांच्या समर्थकाचा पराभव झाला होता.

चर्चित व्यक्ती - विश्वास मंडलिक :
21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे योगतज्ज्ञ विश्वास मंडलिक व मुंबईतील योग इन्स्टिट्यूट या संस्थेला या वर्षाचे पंतप्रधान पुरस्कार दिले गेले

हे पुरस्कार योगविद्येचा प्रसार व विकासासात भरीव कामगिरीबाबत त्यांना दिले गेले.

विश्वास मंडलिक हे योग धाम विद्या (1978 साली), योग विद्या गुरुकुल (1983 साली) या संस्थांचे संस्थापक आहेत. योगविद्येवर त्यांनी 42 पुस्तके लिहिली आहेत.

मुंबईतील योग इन्स्टिट्युट ही 1918 साली योगेंद्रजी यांनी स्थापन केली.

विविध क्षेत्रात लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान देणार्‍या आणि आदर्श तयार करणार्‍या व्यक्तीला वा संस्थेला पंतप्रधान पुरस्कार दिला जातो. मानचिन्ह, मानपत्र व प्रत्येकी 25 लक्ष रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींना राज्यमंत्रीपदाचा दर्जा :
राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने यासंबंधी निर्णय घेतला आहे.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यानंतर महाधिवक्त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांशी संबंधित सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात राज्याची न्यायिक बाजू मांडण्यासाठी महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येते. पहिल्यांदाच न्यायिक बाजू पाहणाऱ्या व्यक्तीला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळणार आहे. विशेष म्हणजे महाधिवक्त्यांना आपल्या वाहनावर लाल दिवा अथवा राष्ट्रध्वज लावता येणार नाही.

महाधिवक्त्यांना मासिक वेतन किंवा न्यायालयात बाजू मांडण्यासाठी मानधन देण्यात येत होते. त्यांना आता राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाल्यामुळे मानधनासोबतच शासकीय निवासस्थान, निवासी दूरध्वनीवरील खर्च, कार्यालयीन कामासाठी गाडी, प्रवास खर्च, शासकीय समारंभातील मानाचे स्थान अशा गोष्टींचाही लाभ होणार आहे.आदेश बांदेकर यांना राज्यमंत्र्याचा दर्जा, राज्य सरकारचा निर्णय झाला आहे.

दिनविशेष

काही महत्वाच्या घटना:

मोझांबिकचा स्वातंत्र्य दिन

कोल्हापूर संस्थानात अ‍ॅल्युमिनिअम बनवण्यासाठी लागणार्‍या बॉक्साईटचे मोठ्या प्रमाणावर साठे असल्याचे आढळून आल्यावर छत्रपती शाहू महाराजांनी अ‍ॅल्युमिनिअमचा कारखाना काढण्याचे प्रयत्‍न सुरू केले. शाहूमहाराजांचे निधन झाल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी ब्रिटिशांच्या सहकार्याने असा कारखाना काढण्यासाठी लंडनमधे कंपनीही स्थापन केली होती.

२००० मॅडम तूसाँ यांच्या मेणांच्या पुतळ्यांचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्‍चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळवणारा तो पहिला हिन्दी अभिनेता ठरला.
१९८३ विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पराभव करुन भारत विजेता.
१९७५ पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सल्ल्यावरुन राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांनी भारतात आणीबाणी जाहीर केली.
१९७५ मोझांबिकला (पोर्तुगालकडून) स्वातंत्र्य मिळाले.
१९३४ महात्मा गांधीना पुणे महापालिकेने मानपत्र दिले. त्या वेळी त्यांच्यावर बॉबहल्ल्याचा प्रयत्‍न झाला.
१९१८ कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला. हा निर्णय पुरोगामी चळवळीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

जन्म :
१९८६ सई ताम्हनकर – अभिनेत्री
१९७५ व्लादिमिर क्रामनिक – रशियन बुद्धीबळपटू
१९७४ करिश्मा कपूर – अभिनेत्री
१९३१ विश्वनाथ प्रताप सिंग – भारताचे ७ वे पंतप्रधान, केन्द्रीय अर्थमंत्री व संरक्षणमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे ४१ वे राजे (मृत्यू: २७ नोव्हेंबर २००८)
१९२४ मदनमोहन – संगीतकार (मृत्यू: १४ जुलै १९७५)
१९०३ एरिक ब्लेअर ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल – इंग्लिश कादंबरीकार व पत्रकार (मृत्यू: २१ जानेवारी १९५०)
१९०० लॉर्ड लुई माउंटबॅटन – भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल (मृत्यू: २७ ऑगस्ट १९७९)

मृत्यू :
२००९ मायकेल जॅक्सन – अमेरिकन पॉप गायक, गीतलेखक, संगीतकार, निर्माता, अभिनेता (जन्म: २९ ऑगस्ट १९५८)
२००० रवीबाला सोमण-चितळे – मिश्र दुहेरीतील माजी राष्ट्रीय बॅडमिंटन विजेत्या (जन्म: ????)
१९७९ अण्णासाहेब – मगर पिंपरी चिंचवडचे पहिले नगराध्यक्ष (जन्म: ????)
१९२२ सत्येंद्रनाथ दत्त – बंगाली कवी (जन्म: ? ? १८८२)