loading...

चालू घडामोडी 15 जून 2018

loading...
✓आंध्रप्रदेशाचा राज्य पक्षी ‘रामाचिलका’ आणि राज्य फूल ‘अदावी उथातीत्ती’ :
गुलाबी रंगाचा मानेवर पट्टा असलेला पोपट, ज्याला रोज-रिंग पॅराकीट (किंवा सित्ताकुला क्रामेरी किंवा तेलुगूमध्ये ‘रामाचिलका’) म्हणून ओळखतात, याला आंध्रप्रदेशाचा राज्य पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
शिवाय, स्थानिक पातळीवर 'अदावी उथातीत्ती' म्हणून ओळखल्या जाणार्‍या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या फुलाला राज्य फूल म्हणून घोषित करण्यात आले आहे.

✓आयुष्मान भारत योजनेसाठी आरोग्य मंत्रालयाचा चार राज्यांसोबत सामंजस्य करार :
राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीमेंतर्गत ‘आयुष्मान भारत’ योजनेला सुरू करण्यासाठी चार राज्यांनी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केले आहेत.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीरया चार राज्यांसोबत आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासोबत झालेल्या करारामुळे ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशाच्या 40% लोकसंख्येला मोफत उपचार मिळणार.

‘आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ या योजनेचे दोन घटक आहेत. पहिला 10.74 लक्ष कुटुंबांना मोफत 5 लक्ष रूपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे आणि दुसरा म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना करणे.

✓राष्ट्रीय गोकुळ मोहिमेंतर्गत बिहारमध्ये गोठीत वीर्य केंद्र उभारले जाणार :
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते बिहारमधील पूर्णिया जिल्ह्याच्या मरंगा गावात ‘गोठीत वीर्य केंद्र’ (Frozen Semen Station) उभारण्यासाठी कोनशीला ठेवण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या 100% अनुदानाने राष्ट्रीय गोकुळ मोहिमेंतर्गत 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या मोहिमेंतर्गत कृषी मंत्रालय पशुपालन, दुग्ध व मत्स्य विभागासोबत कार्य करीत आहे. वर्तमानात कृत्रिम रेतनाचे कार्य बिहारमध्ये CMOFED (सुधा) द्वारे केले जात आहे. कृत्रिम रेतनासाठी उच्च अनुवांशिक दर्जेदार बैलांची गरज असते.

राष्ट्रीय गोकुळ मोहीम हा पुढाकार डिसेंबर 2014 मध्ये गुरा-ढोरांचे देशी वाण जतन करणे आणि विकसित करण्यासाठी घेतला गेला आहे.

✓ प्रोजेक्ट ‘काश्मीर सुपर 50 :
• काश्मीर खोर्‍यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांची शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी 22 मार्च 2013 रोजी प्रोजेक्ट ‘काश्मीर सुपर 50’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

• हा भारतीय लष्कर, सेंटर फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अँड लीडरशीप (CSRL) आणि पेट्रोनॅट LNG लिमिटेड (PLL) यांचा संयुक्त उपक्रम आहे. 11 महिन्यांच्या या कार्यक्रमामधून निवडक विद्यार्थ्यांना IIT-JEE, JKCET आणि अन्य अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी पूर्ण मोफत निवासी प्रशिक्षण दिलेजाते.

• प्रोजेक्ट ‘काश्मीर सुपर 50’ याच्या चालू असलेल्या पाचव्या तुकडीत श्रीनगरमधील 45 मुले आणि नोएडातील 5 मुली शिक्षण घेत आहेत. त्यापैकी यावर्षी 32 विद्यार्थ्यांनी (30 मुले आणि 2 मुली) IIT-JEE मुख्य परीक्षा तर 7 विद्यार्थ्यांनी IIT-JEE अॅडव्हान्स उत्तीर्ण झाले आहेत.

✓डॉ. महाथीर मोहम्मद: मलेशियाचे नवे पंतप्रधान :
• मलेशियात 22 वर्षं पंतप्रधान राहिलेल्या 92 वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ऐतिहासिक विजय मिळवत विजय मिळवला आहे. त्यांच्या पक्षाने 115 जागा जिंकल्या. 92 वर्षीय डॉ. महाथीर मोहम्मद हे जगातले निवडून आलेले सर्वात वयोवृद्ध नेता/व्यक्ती ठरले आहेत.

• मलेशियाचे सातवे पंतप्रधान म्हणून डॉ. महाथीर मोहम्मद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांनी 10 मे 2018 रोजी माजी पंतप्रधान नजीब रझाक यांच्याकडून पदाची जबाबदारी सांभाळली.

• मलेशिया हा आग्नेय (दक्षिण पूर्व) आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर असून पुत्रजय येथे संघराज्य शासनाचे मुख्य केंद्र आहे. रिंगिट हे देशाचे चलन आहे. देशात मलाय भाषा बोलली जाते.

✓विमानतळांच्या क्षमतावृद्धीसाठी ‘नभ (NABH)’ निर्माण पुढाकार :
• केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या ‘नभ निर्माण’ (भारतासाठी अत्‍याधुनिक विमानतळे / NextGen Airports for BHarat -NABH) पुढाकाराचा एक भाग म्हणून विमानतळांच्या क्षमतावृद्धीसाठी कार्य केले जात आहे.

• या उपक्रमाचे तीन मुख्य घटक आहेत - (1) योग्य व समान भूमी अधिग्रहण,
(2) विमानतळांसाठी दीर्घकालीन योजना व प्रादेशिक विकास
(3) सर्व भागधारकांसाठी संतुलित अर्थव्‍यवस्‍था.

• उपक्रमात प्रवासी व माल वाहतूक क्षमता वाढवणे आणि UDAN योजनेंतर्गत 56 नव्या विमानतळांच्या आरंभिक कार्यांवर केंद्रीत केले जाणार.

✓ चर्चित पुस्तक: 'रणजी अँड द म्यूजिक मेकर’ : रस्किन बाँड :
1934 साली भारतात कसौलीमध्ये जन्मलेले रस्किन बाँड हे एक जगविख्यात लेखक (बाल साहित्य) आहेत.

‘द रूम ऑन द रूफ’ (1957) ही त्यांची पहिले कादंबरी आहे.

 त्यांना 1957 साली जॉन लेवेलिन र्हीस मेमोरियल पारितोषिक, 1992 साली इंग्रजी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, 1999 साली पद्मश्री आणि 2014 साली पद्मभूषण पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.

✓ नेपाळमध्ये अरुण-III जलविद्युत प्रकल्पाची कोनशिला ठेवली गेली : 
11 मे 2018 रोजी नेपाळ दौर्‍यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान खडग प्रसाद ओली यांनी काठमांडूमध्ये दूरस्थ प्रणालीद्वारे ‘अरुण-III’ जलविद्युत प्रकल्पाची कोनशिला ठेवली आहे.

हा प्रकल्प एका भारतीय कंपनीकडून चालविल्या जाणार आहे.

नेपाळ हा दक्षिण आशियातला एक देश आहे. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे.
काठमांडू हे देशाचे राजधानी शहर आहे. नेपाळी रुपया हे राष्ट्रीय चलन आहे

✓ आयुष्मान भारत योजनेसाठी आरोग्य मंत्रालयाचा चार राज्यांसोबत सामंजस्य करार :
राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीमेंतर्गत ‘आयुष्मान भारत’ योजनेला सुरू करण्यासाठी चार राज्यांनी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केले आहेत.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, जम्मू-काश्मीरया चार राज्यांसोबत आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशासोबत झालेल्या करारामुळे ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत देशाच्या 40% लोकसंख्येला मोफत उपचार मिळणार.

‘आयुष्मान भारत - राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा मोहीम (ABNHPM)’ या योजनेचे दोन घटक आहेत.

पहिला 10.74 लक्ष कुटुंबांना मोफत 5 लक्ष रूपयांचा आरोग्य विमा प्रदान करणे आणि दुसरा म्हणजे हेल्थ अँड वेलनेस सेंटरची स्थापना करणे.

✓ राष्ट्रीय गोकुळ मोहिमेंतर्गत बिहारमध्ये गोठीत वीर्य केंद्र उभारले जाणार :
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग यांच्या हस्ते बिहारमधील पूर्णिया जिल्ह्याच्या मरंगा गावात ‘गोठीत वीर्य केंद्र’ (Frozen Semen Station) उभारण्यासाठी कोनशीला ठेवण्यात आली आहे.

केंद्र शासनाच्या 100% अनुदानाने राष्ट्रीय गोकुळ मोहिमेंतर्गत 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.

या मोहिमेंतर्गत कृषी मंत्रालय पशुपालन, दुग्ध व मत्स्य विभागासोबत कार्य करीत आहे.

 वर्तमानात कृत्रिम रेतनाचे कार्य बिहारमध्ये CMOFED (सुधा) द्वारे केले जात आहे. कृत्रिम रेतनासाठी उच्च अनुवांशिक दर्जेदार बैलांची गरज असते.

राष्ट्रीय गोकुळ मोहीम हा पुढाकार डिसेंबर 2014 मध्ये गुरा-ढोरांचे देशी वाण जतन करणे आणि विकसित करण्यासाठी घेतला गेला आहे.

काही महत्वाच्या घटना:
२००८ ’लेहमन ब्रदर्स’ या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
२००१ ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यमने राष्ट्रीय ’अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
१९९७ अजामीनपात्र गुन्ह्याचा आरोप असलेली व्यक्ती फरारी होऊन आरोप चुकवत असेल, तर तिच्यावर आरोपपत्र दाखल नसतानाही न्यायमूर्ती अटक वॉरंट जारी करू शकतात असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्‍च न्यायालयाने दिला.
१९९४ इस्त्रायल व व्हॅटिकन सिटी यांमधे पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९९३ संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्त
१९७० बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
१९१९ कॅप्टन जॉन अलकॉक व लेफ्टनंट आर्थर ब्राऊन यांनी विमानातुन सर्वप्रथम अटलांटिक महासागर पार केला.
१८६९ महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला. श्री. पांडूरंग विनायक करमरकर यांनी वेणुताईच्या गळयात माळ घातली.
१८४४ चार्ल्स गुडइयरने रबराच्या व्हल्कनायझेशनचे पेटंट घेतले.
१६६७ वैद्यकीय इतिहासात प्रथम रक्तदान करण्यात आले. जॉं बाप्तिस्ते डेनिस या डॉक्टरने १५ वर्षे वयाच्या एका फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकराचे रक्त टोचले. त्या मुलाला काहीही अपाय झाला नाही, पण नंतर सर्वच माणसांना असले रक्तदान सोसत नाही हे स्पष्ट झाले.

जन्म :
१९४७ प्रेमानंद गज्वी – साहित्यिक व नाटककार
१९३७ किसन बाबूराव तथा ‘अण्णा‘ हजारे – आदर्श ग्रामपरिवर्तन करुन देशाला व जगालाही समाजपरिवर्तनाची नवी दिशा दाखवणारे समाजवेवक
१९३३ सरोजिनी वैद्य – लेखिका (मृत्यू: ३ ऑगस्ट २००७)
१९३२ झिया फरिदुद्दीन डागर – धृपद गायक (मृत्यू: ८ मे २०१३)
१९२९ सुरैय्या जमाल शेख ऊर्फ ’सुरैय्या’ – गायिका व अभिनेत्री (मृत्यू: ३१ जानेवारी २००४)
१९२८ शंकर वैद्य – साहित्यिक
१९२३ केशव जगन्नाथ पुरोहित ऊर्फ ’शांताराम’ – साहित्यिक
१९१७ सज्जाद हुसेन – संगीतकार व मेंडोलीनवादक (मृत्यू: २१ जुलै १९९५ - माहीम, मुंबई)
१९०७ ना. ग. गोरे – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत (मृत्यू: १ मे १९९३)
१८९८ गजानन श्रीपत तथा ’अण्णासाहेब’ खेर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक (मृत्यू: २९ ऑगस्ट १९८६)

मृत्यू :
१९८३ श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ’श्री श्री’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलगु कवी व गीतकार (जन्म: ३० एप्रिल १९१०)
१९७९ सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार (जन्म: २ एप्रिल १९२६)
१९३१ अच्युत बळवंत कोल्हटकर – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, ’संदेश’कार (जन्म: ? ? १८७९)
१५३४ योगी चैतन्य महाप्रभू (जन्म: १८ फेब्रुवारी १४८६)

Post a Comment

0 Comments