loading...

चालू घडामोडी 1 जून 2018

डेक्कन क्वीनला 88 वर्ष पूर्ण :
महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन 1 जून 1930 रोजी प्रथम रुळावर धावली. पुणे शहरावरुन या गाडीला डेक्कन क्वीन हे नाव देण्यात आले.

सुरुवातीला या गाडीला 7 डबे होते. त्यानंतर 12 आणि आता 17 अशी वाढ करण्यात आली आहे. आरामदायी  प्रवासाबरोबरच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या गाडीत अनेक बदल करण्यात आले.

भारतीय नौदलाची ‘देओतीब्बा पर्वत मोहीम :
हिमाचल प्रदेशातील देओतीब्बा (6001 मीटर) पर्वतावर चढाई करण्यासाठी सर्व स्त्री सदस्य सहभागी असलेल्या एका चमूसाठी भारतीय नौदलाने एक मोहीम आयोजित केली आहे.

28 मे ते 15 जून 2018 पर्यंत चालणार्‍या या मोहिमेसाठी लेफ्टनंट कमांडर कोकीला सजवान यांच्या नेतृत्वाखाली 15 साथीदारांची चमू तयार करण्यात आली आहे.

इंडोनेशियाच्या नागरिकांना भारताकडून मोफत व्हिसा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियाच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या नागरिकांना 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्यात येणार असल्याची घोषणा केली.

इंडोनेशियातील जकार्ता येथील 'जकार्ता कन्व्हेन्शन सेंटर' मध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, इंडिया हे नाव केवळ आमच्या देशाचे यमक नसून, भारत-इंडोनेशिया मैत्रीचे यमक आहे.

यावेळी पंतप्रधान मोदींनी इंडोनेशियातील नागरिकांना 'न्यू इंडिया'चा (नवा भारत) अनुभव यावा, यासाठी 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्यात येईल, अशी घोषणा केली. 'तुमच्यापैकी अनेकांनी भारत दर्शन केले नसेल. त्यामुळे मी आता तुम्हाला आमंत्रित करत आहे, की पुढील वर्षी भारतात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भारतात या', असे आमंत्रण मोदींनी इंडोनेशियातील नागरिकांना दिले.

दरम्यान, इंडोनेशियाच्या दौऱ्यात मोदींनी, इंडोनेशिया स्वातंत्र्यता संग्रामामध्ये हुतात्मा झालेल्या 7 हजारांपेक्षा अधिक जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

राज्यात बारावीत यंदाही मुलीच अव्वलस्थानी :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी जाहीर करण्यात आला. या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे.

राज्याचा एकूण निकाल 88.41 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक 94.85 टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा 86.13 टक्के लागला.

राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. या वेळी राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले उपस्थित होते. यंदाही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.

सर्व विभागांतून 92.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून, 85.23 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात एक टक्का घट झाली आहे. राज्यात यंदा 14 लाख 16 हजार 986 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 12 लाख 52 हजार 817 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये 6 लाख 68 हजार 125 मुले, तर 5 लाख 84 हजार 692 मुली उत्तीर्ण झाल्या.

भारताचा जीडीपी 7.3 टक्क्यांनी वाढणार :
भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजामध्ये घट करण्यात आल्याचे मूडीज रेटिंग या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने म्हटले आहे. या वर्षी भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दराने वाढेल असा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र, यात कपात करताना भारताची अर्थव्यवस्था 7.3 टक्क्यांनी वाढेल असा सुधारीत अंदाज मूडीजनं वर्तवला आहे. यामुळे निवडणुकीच्या वर्षाआधी मोदी सरकारला याचा फटका बसेल अशी शक्यता आहे.

विशेष म्हणजे खनिज तेलाच्या वाढलेल्या किंमतींमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसणार असल्याचे मूडीजने म्हटले आहे. अर्थात 2019 मध्ये मात्र भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्क्यांच्या दरानेच वाढेल असा अंदाज मात्र कायम ठेवला आहे.

समाधानकारक पाऊस, शेतमालाला किमान आधारभूत किंमत आणि ग्रामीण भागातील वाढती उलाढाल यामुळे अर्थव्यवस्थेचा वाढीचा वेग चांगला राहील, मात्र इंधनाच्या महागाईमुळे अर्थव्यवस्थेची वाढ 7.5 टक्क्यांऐवजी 7.3 टक्क्यांनी घटेल असे मूडीजने म्हटले आहे.

तसेच येत्या काही महिन्यांमध्ये जीएसटीचा परिणामही अर्थव्यवस्थेवर जाणवणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जीएसटीमुळे अर्थव्यवस्था काही प्रमाणात मंदावणार असली तरी दीर्घकालीन दृष्टीने ते फायद्याचे ठरणार असल्याचे पतनिर्धारण संस्थेने नमूद केले आहे. जीएसटी संदर्भात एका वर्षभरात परिस्थिती समाधानकारक होईल असेही मूडीजने म्हटले आहे.

 काही महत्वाच्या घटना :
१ जून – जागतिक दुध दिन

१७९२: केंटुकी अमेरिकेचे १५वे राज्य बनले.
१७९६: टेनेसी अमेरिकेचे १६वे राज्य बनले.
१८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
१९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.
१९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.
१९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.
१९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
१९६१: अमेरिकेतील फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) ला जगात सर्वप्रथम स्टिरीओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी मिळाली.
१९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
२००१: नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
२००३: चीन मधील महाप्रचंड थ्री गॉर्जेस धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली.
२००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.


 जन्म :
१८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)
१८४३: फिंगरप्रिंटिंग चे जनक हेन्री फॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९३०)
१८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)
१९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)
१९२६: अमेरिकन अभिनेत्री मेरिलीन मन्रो यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट १९६२)
१९२९: हिन्दी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशिद ऊर्फ नर्गिस दत्त यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९८१)
१९४७: मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक रॉन डेनिस यांचा जन्म.
१९६५: इंग्लिश बुद्धिबळपटू नायगेल शॉर्ट यांचा जन्म.
१९७०: हिंदी चित्रपट अभिनेता आर. माधवन यांचा जन्म.
१९८५: भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म.

 मृत्यू :
१८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)
१८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)
१८७२: न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १७९५)
१९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून १८७१)
१९४४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८६७)
१९६०: जर्मन-ऑस्ट्रियन बहीण पॉड हिटलर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९६)
१९६२: दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या अ‍ॅडॉल्फ आइकमॅन या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
१९६८: अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका हेलन केलर यांचे निधन. (जन्म: २७ जून १८८०)
१९८४: हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.
१९८७: दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक के.ए. अब्बास यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१४)
१९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)
१९९८: ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१६)
१९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)
२०००: एकपात्री कलाकार मधुकर महादेव टिल्लू यांचे निधन.
२००१: नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या. (जन्म: २८ डिसेंबर१९४५)
२००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९६९)
२००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.

Post a Comment

1 Comments