loading...

चालू घडामोडी 30 मे 2018

loading...
कुम्मानम राजशेखरन मिझोरामच्या राज्यपालपदी :
केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी आज मिझोराम राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश 'अजीत सिंह' यांच्याकडून पदाची शपथ घेतली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राजशेखरन यांनी 1970 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात केली.
2015 मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
2014 मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून मिझोरामचे राज्यपाल पद भूषविणारे राजशेखरन हे आठवे व्यक्ती आहेत.
मावळते राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांचा कार्यकाळ सोमवारी संपला.

आधुनिक भारताची नवी तीर्थक्षेत्रे :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील चैत्यभूमी स्मारक, महात्मा गांधी यांची दिल्लीतील राजघाटावरची समाधी आणि पंजाबातील हुसेनीवाला येथील भगत सिंग यांची समाधी, जालियनवाला बाग व देशातील अन्य स्थळे ही आधुनिक भारताची तीर्थक्षेत्रे बनावीत यासाठी मुंबई सर्वोदय मंडळातर्फे या स्थळांच्या यात्रा आयोजित केल्या जाणार आहेत. या व असे अन्य उपक्रम करण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे आधार धार्मिक होते. चार धाम, बारा जोतिर्लिंग अशी तीर्थस्थळे देश एक असल्याची जाणीव करून देत होती.

मात्र ही जाणीव मर्यादित होती. म्हणूनच एकविसाव्या शतकात नवी तीर्थस्थळे शोधायला हवीत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही ही मूल्ये राष्ट्र आणि राष्ट्रीय एकात्मता यांचे आधार आहेत. या मूल्यांचा पुरस्कार करणारे थोर राष्ट्रनायक महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहिद भगत सिंग हे देशाच्या ऐक्याचे आधार आहेत. त्यांच्या समाधी पुढील पिढीला प्रेरणा देणाऱ्या असून या स्थळांच्या यात्रेचे आयोजन मुंबई सर्वोदय मंडळातर्फे केले जाणार आहे.

त्यासाठी २० मे रोजी सकाळी ११ वाजता, मुंबई सर्वोदय मंडळ, २९९ ताडदेव रोड, नानाचौक, ग्रँट रोड पश्चिम येथे कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे ९८३३०७५६०६ या क्रमांकावर नोंदवावीत, असे आवाहन मंडळाचे प्रवीण पाटील व मृणाल मथुरिया यांनी केले आहे.

जनरल व्ही. के. सिंह उत्तर कोरियामध्ये, 20 वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच भारतीय नेत्याची भेट

1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्तीने उत्तर कोरियाला भेट दिली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला.

प्योंगयांग :
परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी अचानक उत्तर कोरियाला भेट दिली. उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथे जाऊन त्यांनी कोरियन सरकारच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. 1998 नंतर प्रथमच भारतातील उच्चपदस्थ व्यक्ती उत्तर कोरियाला गेली आहे. 15 आणि 16 मे असा त्यांनी उत्तर कोरियाचा दौरा केला.

सिंह यांनी उत्तर कोरियाचे परराष्ट्र आणि सांस्कृतीक कार्य मंत्री किम योंग दाए यांची भेट घेतली व विविध राजकीय, प्रादेशिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतीक सहकार्य अशा विषयांवर त्यांनी चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने नुकत्याच दक्षिण कोरियासोबत झालेल्या चर्चेबद्दल सिंह यांना माहिती दिली त्याचप्रमाणे सिंह यांनीही उत्तर कोरिया व पाकिस्तान यांच्यामधिल संबंधांचा विषय उपस्थित केला. भारताच्या शेजारील देशात (पाकिस्तानात) कोणत्याही प्रकारे अण्वस्त्रांची वाढ होणे भारतासाठी काळजीचा मुद्दा आहे असे मत सिंह यांनी व्यक्त केले. त्यावर  भारताला कोणत्याही प्रकारचा सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नास सामोरे जावे लागणार नाही असे आश्वासन उत्तर कोरियातर्फे दिले गेले. यावेळेस भारताचे उत्तर कोरियातील राजदूत अतुल गोतसुर्वे यांनी आपल्या पदासाठी मान्यतापत्र (क्रिडेन्शिअल) उत्तर कोरियाच्या पिपल्स असेम्ब्लीचे अध्यक्ष किम योंग नाम यांना सादर केली. सोमवारीच गोतसुर्वे यांनी पदभार स्वीकारला आहे.

व्ही. के. सिंह यांनी अचानक उत्तर कोरियाला भेट दिल्याने आणि त्या भेटीबाबत गुप्तता पाळल्याने भारत या देशाशी आपले संबंध पूर्ववत करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे.  मार्च 2017मध्ये भारताने अन्न आणि औषधे वगळता इतर कोणत्याही वस्तूंचा उत्तर कोरियाशी व्यापार करण्यावर बंदी घातली होती. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये उत्तर कोरियावर सर्वपरीने बंदी घालण्याची विनंती केली होती. तसेच उत्तर कोरियात प्योंगयांग येथे असणाऱ्या दुतावासाला बंद करण्याची विनंती अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स टिलरसन यांनी केली होती. त्या विनंतीला भारताला नाकारले होते. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये तणाव निवळत असल्याचे दिसताच भारताने आपल्या धोरणामध्ये बदल केल्याचे दिसून येत आहे

25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका :
इस्लामाबाद- पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी नासिर उल मुल्क यांच्याकडे देण्यात आलेली आहे. ते पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश होते आता पंतप्रधानपदाची त्यांच्याकडे अंतरिम जबाबदारी असेल.

25 जुलै रोजी पाकिस्तानात निवडणुका होत आहेत.नासिर उल मुल्क यांच्या नेमणुकीवर कोणताही पाकिस्तानी माणूस बोट दाखवू शकत नाही असं अब्बासी यांनी त्यांच्या नेमणुकीबद्दल बोलताना सांगितले. यावेळेस त्यांच्याशेजारी विरोधीपक्षनेते सय्यद खुर्शिद अहमद शाह होते. अब्बासी यांची पाकिस्तान मुस्लीम लिग नवाज आणि शाह यांच्या पाकिस्तान पिपल्स पार्टीमध्ये या विषयावरुन बराच तणाव होता.
गुरुवारी पाकिस्तानची संसद बरखास्त होणार आहे. मुल्क यांनी यापुर्वी पाकिस्तानच्या निर्वाचन आयोगाचे प्रमुखपद सांभाळले आहे.
अंतरिम सरकारकडे मोठे निर्णय घेण्याचे फारसे अधिकार नसतात. फक्त नवे सरकार सत्तेत येईपर्यंत त्यांना सत्ता सांभाळावी लागते.

✓गृह मंत्रालयात महिला सुरक्षा विभागाची स्थापना :
नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाने स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधी मुद्द्यांना हाताळण्यासाठी एका नव्या विभागाची स्थापना केली आहे.

महिला सुरक्षा विभाग संबंधित मंत्रालये, विभाग आणि राज्य शासनांच्या समन्वयाने स्त्रियांच्या सुरक्षेसंबंधी सर्व आयामांकडे म्हणजे सोयी-सुविधा, योजना, निर्भया कोष, धोरणे तसेच क्राइम अँड क्रिमिनल ट्रेकिंग अँड नेटवर्क सिस्टम (CCTNS) आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद खाते (NCRB) यासारख्या बाबींकडे लक्ष देणार आहे.
ईस्टर्न पेरीफेरल द्रुतगती मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘ईस्टर्न पेरिफेरल द्रुतगती मार्गा’चे उद्घाटन करण्यात आले आहे. हा मार्ग दिल्लीला गाझियाबाद, फरीदाबाद, ग्रेटर नोएडा आणि पलवल यांच्याशी जोडतो.

135 किलोमीटर लांबीच्या या सिग्नल फ्री मार्गावर ताशी 120 किलोमीटरच्या गतीने वाहन चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. विक्रमी 500 दिवसात 11,000 कोटी रुपयांच्या खर्चाने बांधण्यात आलेला सहा पदरी मार्ग सर्व अत्याधुनिक संनियंत्रण व देखरेख सुविधांनी सुसज्जित आहे. उत्तरप्रदेश ते हरियाणा या दरम्यान चालणारी वाहतूक आता दिल्लीच्या बाहेरून होणार.

शिवाय, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गाच्या 9 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे.

भारतात ‘ग्रीन’ क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी BCCI आणि UNEP मध्ये करार :
भारतात ‘ग्रीन’ क्रिकेट संकल्पनेखाली खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) आणि संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) यांच्यात एक करार झाला आहे.

देशासमोर असलेल्या प्रमुख पर्यावरणीय आव्हानांबद्दल जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने हरित उपक्रमांमध्ये क्रिकेटपटू व चाहत्यांना पर्यावरणीय प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास प्रोत्साहन दिले जाईल, ज्यामधून खेळादरम्यान मैदानावर दर्शकांकडून होणार्‍या प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्याच्या पुनर्वापरावर जोर दिला जाईल.

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) ची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) हा 5 जून 1972 रोजी स्थापन करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाचा एक विभाग आहे, जे पर्यावरणविषयक धोरणे आणि पद्धती यांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करते. याचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.