चालू घडामोडी 29 मे 2018

 वानखेडे स्टेडियमवर 'वॉटसन' वादळ! चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन :
शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.
शेन वॉटसनच्या वादळी शतकामुळे चेन्नईनं तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हैदराबादनं ठेवलेल्या १७९ रनचा पाठलाग करताना चेन्नईनं १८.३ ओव्हरमध्ये १८१/२ एव्हढा स्कोअर करत ८ विकेटनं ही मॅच जिंकली. शेन वॉटसननं ५७ बॉलमध्ये नाबाद ११७ रन केल्या. वॉटसनच्या खेळीमध्ये ८ सिक्स आणि ११ फोरचा समावेश होता. फॅप डुप्लेसिसची विकेट लवकर पडल्यानंतर रैनानं वॉटसनला चांगली साथ दिली. रैनानं २४ बॉलमध्ये ३२ रन केल्या. वॉटसननं या मॅचची सुरुवात अतिशय संथ केली. भुवनेश्वर कुमारची पहिली ओव्हर वॉटसननं मेडन खेळून काढली. पहिल्या १० बॉलमध्ये वॉटसनला एकही रन काढता आली नाही पण त्यानंतरच्या ४१ बॉलमध्ये वॉटसननं शतक पूर्ण केलं. हैदराबादकडून संदीप शर्मानं एक तर कार्लोस ब्रॅथवेटनंही एक विकेट घेतली.

हैदराबादनं चेन्नईपुढे १७९ रनचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादनं २० ओव्हरमध्ये १७८/६ एवढा स्कोअर केला. या मॅचमध्ये चेन्नईचा कर्णधार धोनीनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनिंगला आलेला श्रीवत्स गोस्वामी स्कोअरबोर्डवर १३ रन असताना रन आऊट झाला. त्यानंतर शिखर धवन आणि हैदराबादचा कर्णधार केन विलियमसननं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण धवन २६ रनवर आऊट झाला. केन विलियमसननं ३६ बॉलमध्ये सर्वाधिक ४७ रन केल्या. तर युसुफ पठाणनं २५ बॉलमध्ये नाबाद ४५ रन केल्या. कार्लोस ब्रॅथवेटनं ११ बॉलमध्ये २१ रनची जलद खेळी केली. ब्रॅथवेट २० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला आऊट झाला. चेन्नईकडून एनगीडी, शार्दुल ठाकूर, करण शर्मा, ड्वॅन ब्राव्हो आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १ विकेट मिळाली.

चेन्नईचा तिसऱ्यांदा चॅम्पियन :
आयपीएल जिंकण्याची चेन्नईची तिसरी वेळ आहे. याआधी चेन्नईनं २०१० आणि २०११ साली आयपीएल जिंकली होती. तिसऱ्यांदा आयपीएल जिंकण्याच्या मुंबईच्या रेकॉर्डशी चेन्नईनं आता बरोबरी केली आहे. मुंबईनं २०१३, २०१५ आणि २०१७ साली आयपीएल जिंकली होती. दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नईनं आयपीएलमध्ये कमबॅक केलं होतं. आणि आता मोठ्या दिमाखात त्यांनी फायनलमध्ये विजय मिळवला आहे.
✓ पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार

• पोलंडची लेखिका ओल्गा टोकरकझ्यूक ह्यांना फिक्शन श्रेणीत प्रतिष्ठित मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार 2018 देऊन सन्मानित करण्यात आले आहे. टोकरकझ्यूक ह्यांना हा सन्मान त्यांच्या 'फ्लाइट्स' शीर्षकाच्या कादंबरीसाठी देण्यात आला आहे.

• यासोबतच, ओल्गा टोकरकझ्यूक ह्या 50 वर्षांच्या इतिहासात मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त करणारी पोलंडची पहिली लेखिका ठरली आहे. 50,000 पाउंडची बक्षि‍साची रक्कम लेखिका आणि त्यांचे अनुवादक जेनिफर क्रॉफ्ट यांच्यामध्ये विभाजित केली जाणार.

• मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार (Man Booker International Prize) हा ब्रिटनकडून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय साहित्यिक पुरस्कार आहे आणि जून 2004 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

✓चर्चित खेळाडू : अर्जुन वाजपेयी:
• भारताचा युवा पर्वतारोही अर्जुन वाजपेयी (24 वर्ष) हा ‘समिट सिक्स’ मध्ये 8,000 मीटरपेक्षा उंच असलेल्या सहा पर्वतशिखरांना सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती  ठरला आहे.

• मोहिमेमधील शेवटच्या जगातली तिसरी सर्वात उंच कांचनजंगा (8586 मीटर)च्या शिखरावर चढाई करत 24 वर्षीय वाजपेयीने नवा जागतिक विक्रम बनविलेला आहे.

• समिट सिक्स’ मध्ये एव्हरेस्ट (8,848 मी), ल्होत्से (8,516 मी), मनास्लू (8,163 मी), चोय (8,201 मी), मकालू (8,485 मी), कांचनजंगा (8,586 मी) या पर्वतांवर चढाई केली जाते.

✓जागतिक वारा शिखर परिषद (Global Wind Summit)
ठिकाण :- हॅमबर्ग (जर्मनी)
कालावधी :- 20 ते 28 सप्टेंबर 2018
पहिलीच शिखर परिषद भारतासह 100 देशांचे प्रतींनिधी उपस्थित असतील सर्वाधिक पवन ऊर्जा स्थापित क्षमता असलेले देश       १) चीन     २) अमेरिका     ३) जर्मनी      ४) भारत
भारताची स्थापित क्षमता :३३ गिगावॅट भारताने २०२२ पर्यंत ६० गिगावॅट पवन ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे.

✓एव्हरेस्ट सर करणाऱ्या ५ आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रत्येकी २५ लाख रुपये देऊन गौरव - सुधीर मुनगंटीवार
मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ५ आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रु. चे पारितोषिक तर ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांना प्रत्येकी 10 लाख रु. देऊन गौरविले जाणार असल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच एव्हरेस्ट सर करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

उबेर चषक : बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या उबेर चषक स्पर्धेच्या महिला एकल गटात अंतिम सामन्यात जपानची बॅडमिंटनपटू आकाने यामागूची हिने थायलंडच्या रातचानोक इंतानोन हिचा पराभव करून जेतेपद मिळवले आहे. जपानने 37 वर्षांनंतर उबर चषक मिळवला आहे. यापूर्वी जपानने 1981 साली हा किताब जिंकला होता. उबर चषक ही एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे, ज्यामध्ये विविध देशांचे राष्ट्रीय महिला बॅडमिंटन संघ भाग घेतात. ही द्वैवार्षिक स्पर्धा आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा 1956–1957 साली खेळली गेली. 

कोलंबिया:
• कोलंबिया उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) मध्ये औपचारिकपणे सामील झाले आहे आणि यासोबतच हा NATO मध्ये सामील होणारा लॅटिन अमेरिकेमधील पहिला देश ठरला आहे.
• अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इराक, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मंगोलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या देशांच्या श्रेणीत कोलंबिया सामील झाले आहे.
• उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO) हे 4 एप्रिल 1949 रोजी उत्तर अटलांटिक कराराच्या आधारावर उत्तर अमेरिकेतील व युरोपीय राज्यांनी स्थापन करण्यात आलेली आंतर-शासकीय सैन्य युती आहे. NATO चे मुख्यालय ब्रुसेल्स (बेल्जियम) मध्ये आहे.