loading...

MPSC मार्फत निवडली जाणारी पदे

loading...
महाराष्ट्र लोकसेवा आयोग [MPSC]
या परीक्षा च्या माध्यमातून राज्य सरकारच्या अंतर्गत प्रथम व द्वितीय श्रेणीच्या अधिकाऱ्यांची निवड केली जाते. या परीक्षेद्वारे निवडली जाणारी काही पदे पुढील प्रमाणे-


 • उपजिल्हाधिकारी[Dy. Collector]
 • पोलीस उपनिरीक्षक [Dy.SP/ASP]
 • तहसीलदार
 • नायब तहसीलदार
 • गटविकास अधिकारी[BDO]
 • वित्त व लेखाअधिकारी[A/C Finance Officer]
 • विक्रीकर अधिकारी[ STO]
 • तालुका भूमी अभिलेख निरीक्षक[TLRI]
 • परिवहन अधिकारी[RTO]
 • राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त
 • उप मुख्य कार्यकारी अधिकारी
 • जिल्हा उपनिबंधक
 • सहकार अधिकारी
 • कृषी अधिकारी
पात्रता 
वयाची पात्रता :

 • किमान २१ वर्ष पूर्ण झालेल्या खुल्या किंवा साधारण वर्गातील उमेदवारांना हि परीक्षा वयाची ३८ वर्ष पूर्ण होई पर्यत देता येईल .
 • इतर मागासवर्गीय (OBC), अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) सवंगवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्ष इतकी शिथिल करण्यात आली आहे .म्हणजेच ते वयाची ४३ वर्ष पूर्ण होई पर्यत परीक्षा देऊ शकतात .
 • अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींना वयोमर्यादेत १० वर्ष शिथिली ठेवण्यात आली आहेत मात्र अपंगत्व किमान ४०% असणे आवश्यक आहे.
 • हि परीक्षा सर्व संवर्गातील उमेदवारांना संबंधित वयोमर्यादेपर्यतं कितीही वेळा देता येते.
 •  
  शैक्षणिक पात्रता :


 • पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाला असलेल्या किंवा पदवी पूर्ण झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला हि राज्य लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा देता येते .कोणत्याही शासकीय मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी यासाठी वैध समजली जाईल यासाठी कला, विज्ञा, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, जैव, अभियांत्रिकी ,व्यवस्थापन इ. कोणत्याही क्षेत्रातील पदवी वैध असते.

 • परीक्षेचे स्वरूप :

 • हि परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अश्या तीन टप्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा हि बहू पर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते .पूर्व परीक्षेत २ पेपर असतात. पहिला पेपर हा सामान्य अध्ययन व दुसरा पेपर हा C-SAT विषयाचा असतो.
 • या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी प्रवेश दिला जातो. मुख्य परीक्षेत विद्यार्थ्यांना ६ पेपर सोडवावे लागता.
 • मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला /किंवा उमेदवारांना मुलाखती करता बोलावले जाते. व मुख्य परीक्षेत तसेच मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर परीक्षेचा अंतिम निकाल घोषित होतो.

 • पूर्व परीक्षेसाठी प्रश्‍नपत्रिकेचे स्वरूप , पात्रतेसाठी अटी व अभ्यासक्रम :


 • पूर्व परीक्षेत उमेदवारांना बहू पर्यायी स्वरूपाच्या दोन प्रश्‍नपत्रिका सोडावाव्या लागतात. दोन्ही प्रश्‍नपत्रिका ह्या प्रत्येकी २०० गुणांच्या असतात प्रत्येक पेपरसाठी दोन तासाची वेळ दिलेली असते.
 • सकाळ च्या सत्रात होणार पेपर हा सामान्य अध्ययनावर असतो . या प्रश्‍नपत्रिकेत प्रत्येकी दोन गुणांचा एक असे १०० प्रश्‍न असतात .दुसरया सत्रात होणार पेपर हा C-SAT या विषयाचा असतो. या प्रश्‍नानमध्ये प्रत्येकी अडीच गुणांचा एक असे ८० प्रश्‍न असतात. या दोन्ही पेपरमध्ये प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारावरच उमेवादारांना पात्र ठरवले जाते.
 • उमेवादारांनी चुकीची उत्तरे दिल्यास, त्यांनी लिहलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्‍नात असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा होतील. म्हणजेच या परीक्षेसाठी नकारात्मक गुण पद्धती लागू असते. मात्र सोडवलेल्या प्रश्‍नासाठी अशी अट लागू नसते.
 • मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असणारे गुण दरवर्षी आयोगाकडून ठरवले जातात. यात निवड करण्यासाठी उपलब्ध पदाची संख्या व परीक्षा देणाऱ्या उमेवादरांची संख्या विचारात घेतली जाते. जेवढी पदे आयोगाकडून भरली जाणे अपेक्षित असते. त्या संख्येच्या १२ ते पंधरा १५ मुख्य परीक्षेतून पात्र मुलाखतीसाठी पात्र ठरविले जातात. त्यामुळे अर्हतेसाठी किती गुण प्राप्त करायचे हा विचार न करता उत्तम गुण प्राप्त करायचे ध्येय उमेवाद्वरानी ठेवावे.