loading...

पुणे जिल्हा माहिती मराठी

भौगोलिक स्थान : १७.५४° ते १०.२४° उत्तर अक्षांश व ७३.१९° ते ७५.१०° पूर्व रेखांश.
समुद्रसपाटी पासून जिल्ह्याची उंची : ५६० मी. जिल्ह्याच्या उत्तरेस, पूर्वेस व ईशान्येस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेस, नैऋत्येस सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, वायव्येस ठाणे जिल्हा आहे.

 • प्रशासकीय विभाग : पुणे विभाग
 • मुख्यालय : पुणे
 • क्षेत्रफळ : १५,६४२ चौकिमी (६,०३९ चौमैल)
 • लोकसंख्या : ९४,२६,९५९ [पुरुष लोकसंख्या ४९,३६,३६२, स्त्री लोकसंख्या ४४,९०,५९७ ]
 • घनता : ६००/चौकिमी (१६००/चौमैल)
 • साक्षरता : ८७.१९%
 • लिंग गुणोत्तर : ९१९/१,०००
 • लोकसभा मतदार संघ : १.पुणे २.बारामती ३.शिरूर ४.मावळ (रायगड जिल्ह्याशी सहसामायिक)
 • विधानसभा जागा : २१
 • महानगरपालिका : २
 • एकून नगरपरिषदा : १३
 • तहसील कार्यालये : १५
 • उपविभागीय कार्यालये : ८
 • भूसंपादन कार्यालये : २६
 • कटक मंडळे : २
 • एकूण ग्रामपंचायती : १,४०५
 • एकूण तालुके (१४) : १.जुन्नर २.आंबेगाव ३.खेड ४.शिरूर ५.दौंड ६.बारामती ७.इंदापूर ८.मुळशी ९.मावळ १०.हवेली ११.पुणे १२.भोर १३.पुरंदर १४.वेल्हा 
 • प्रमुख मार्ग : NH – ४, ९, ५०
 • आर.टी.ओ.कोड : MH- १२, १४

इतिहास : पुण्यावर आजपर्यंत राष्ट्रकुट, मराठा, पेशवे, निजाम, ब्रिटीश या सत्तांचा अंमल राहिला आहे. इसवी सन ८ व्या शतकाच्या काळात म्हणजे साधारणपणे ७५८ ते ७६८ या काळात सापडलेल्या ताम्रपत्रावर पुण्याचा ‘पुण्य विषय’ आणि ‘पुणका विषय’ असा उल्लेख होता. त्यानंतरच्या काही शतकानंतर पुण्याचा उल्लेख “पुनेकावडी” आणि पुणेवडी” किंवा “पुनवडी” असा उल्लेख आहे. यावरूनच या शहराला पुणे असे नाव पडले आहे. पुणे जिल्ह्यावर व शहरावर अधिक काळाकरिता मराठा व पेशवा यांचे वर्चस्व राहिल्यामुळे पुण्यात पेशवाई संस्कृती अधिक प्रमाणात रुजू झाली आहे.
हवामान : मध्यम प्रकारचे. तापमान –किमान ७°से. कमाल ४०°से पर्जन्यमान – ६०० ते ७०० मिमी.
प्रमुख नद्या : आंद्रा, आंबी, आर, इंद्रायणी, उरवडे, कऱ्हा, कानंदी, कुकडी, कुंडली, कोळवण, गुंजवणी, घोड, देव, नाग, नीरा, पवना, पुष्पावती, बुधा, बेलावडे, भामा, भीमा, मांडवी, मीना, मुठा, मुळा, मोसे, राम, रीहे, येलवंती, वेळवंडी, शिवगंगा, सुधा, वेळ नदी.
प्रमुख धरणे : आंद्रा व्हॅली, भामा आसखेड, भाटघर, भुशी, नीरादेवघर, पानशेत, पिंपळगाव जोगे, शेटफळ, शिरसूफळ, शिरवता, चासकमान, चीलेवाडी, डिंभे, गुंजवणी, खडकवासला, माणिकडोह, टेमघर, ठोकरवाडी, उज्जनी, वडिवळे, वरसगाव, मुळशी, नाझरे, वडज, वाळवण, येडगाव धरण.
प्रमुख किल्ले : कोरीगड, लोहागड, मल्हारगड, पुरंदर किल्ला, शनिवारवाडा, लाल महाल, राजगड, संग्राम दुर्ग(चाकण), शिवनेरी, सिंहगड, तिकोना, तोरणा किल्ला, तुंग किल्ला, विसापूर किल्ला, विशाळगड, चावंद, दौलतमंगल, हडसर, इंदुरी, जीवधन, नारायणगड, निमगिरी, राजमाची, रोहीडा, सिंदोला, अनाघाई, भोईरगिरी, कावळा, कैलासगड, मोरगिरी, विसापूर गड.
अष्टविनायक मंदिरे : १.लेण्याद्री (श्री गिरिजात्मज) २.मोरगाव (श्री मोरेश्वर) ३. रांजणगाव (श्री महागणपती) ४. थेऊर (श्री चिंतामणी) ५.ओझर (श्री विघ्नेश्वर) (अष्टविनायकांपैकी पाच विनायकमंदिरे पुण्यात आहेत.)
प्रमुख घाट : भोर घाट, कात्रज घाट, माळशेज घाट, नाणेघाट, ताम्हिणी घाट.
प्रमुख गुहा : बेडसे गुहा, भाजा गुहा, घोरवडी गुहा, कारला गुहा, लेण्याद्री गुहा, शेलारवाडी गुहा, शिरवळ गुहा, शिवनेरी गुहा, तुळजा गुहा.
प्रमुख क्रीडांगणे : नेहरू स्टेडीयम, PCMC हॉकी स्टेडीयम, श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, MCA स्टेडीयम.
मुख्य पिके : गहू, डाळी, भाज्या, कांदा, तांदूळ, ज्वारी, बाजरी, उस, भुईमुग, तेलबिया, सुर्यफुले.
इतर उदयोग : वस्तुनिर्माण उद्योग, माहिती व तंत्रज्ञान उद्योग, इलेक्ट्रोनिक वस्तू निर्मिती, शेतीपूरक उद्योग.
शैक्षणिक : पूर्ण जगभरात प्रसिद्धीस पावलेले अनेक विद्यापीठ पुण्यात आहेत. पुणेला विद्येचे माहेरघर असे संबोधले जाते. पुणे शहराला शिक्षणाच्या बाबतीत ‘पूर्व ऑक्सफोर्ड’ या नावानेदेखील ओळखतात. पुण्यात जवळपास ५० च्या वर प्रमुख महाविद्यालये व विद्यापीठे अस्तित्वात आहेत.
उद्याने आणि प्राणीसंग्रहालये : बुंद उद्यान, राजीव गांधी प्राणी उद्यान, शून्यो उद्यान, सारसबाग, शहीद मेजर प्रदीप तथवाडे उद्यान, कमला नेहरू उद्यान, पु.ल. देशपांडे उद्यान, बाणेर-पाषाण जैवविविधता उद्यान, पेशवे उद्यान.
दळणवळणाच्या सोयी :
 1. रस्ते वाहतूक – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड. (PMPML), रेनबो बस जलद यंत्रणा, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे.
 2. रेल्वे वाहतूक – पुणे उपनगर रेल्वे.
 3. प्रमुख रेल्वे स्थानके – पुणे जंक्शन, दौंड जंक्शन, आकुर्डी रेल्वे स्थानक, बेगडेवाडी स्थानक, चिंचवड स्थानक, दापोली स्थानक, देहू रोड स्थानक, घोरावाडी स्थानक, कामशेत स्थानक, कान्हे स्थानक, कासारवाडी स्थानक, खडकी स्थानक, खंडाळा स्थानक, लोणावळा स्थानक, मालवली स्थानक, पिंपरी स्थानक, शिवाजीनगर स्थानक, तळेगाव स्थानक, वडगाव स्थानक.
 4. एक्स्प्रेस रेल्वे – डेक्कन क्वीन(Deccan Queen), इंद्रायणी एक्स्प्रेस, सिंहगड एक्स्प्रेस.
 5. हवाई वाहतूक – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, न्यू पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, हडपसर विमानतळ.
खाद्य संस्कृती : पुण्यात पारंपारिक पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यामध्ये पुरणपोळी, आमटी, पिठलं- भाकरी, वरण-भात, मटकीची उसळ, थालीपीठ, वाडा पाव, मिसळ पाव, बाकर वडी. इ. पदार्थ समाविष्ट आहेत.
पर्यटन : शनिवारवाडा, आगा खान पॅलेस, रुबी हॉल, विश्रामबाग वाडा, चतुःश्रुंगी मंदिर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पाताळेश्वर, कसबा गणपती, दशभुज गणपती मंदिर, राजा दिनकर केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय, बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय, पुणे आदिवासी संग्रहालय, राष्ट्रीय युद्ध संग्रहालय, गौरवपाती संग्रहालय, भीमाशंकर ज्योतिर्लिंग व अभयारण्य, संत ज्ञानेश्वर मंदिर आळंदी, संत चांगदेव व दत्त मंदिर नारायणपूर, संत तुकाराम यांचे जन्मस्थान देहू, खंडोबा मंदिर जेजुरी, पर्वती टेकडी, संभाजी महाराज समाधी वढू बुद्रुक, कात्रज सर्पोद्योन, अप्पूघर, लोणावळा खंडाळा थंड हवेची ठिकाणे, खडकवासला धरण.
विशेष व्यक्ती : छत्रपती शिवाजी महाराज, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव, बाळाजी बाजीराव, माधवराव बल्लाळ, नारायणराव, सेनापती बापट, पटवर्धन राजे घराणे, रघुनाथराव, सवाई माधवराव, बाजीराव दुसरा, नाना साहिब, महादेव गोविंद रानडे, बाळ गंगाधर टिळक, चंद्रशेखर आगाशे, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, पु.ल. देशपांडे, बाबासाहेब पुरंदरे, मंगेश तेंडूलकर, प्रल्हाद केशव अत्रे, संदीप खरे, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, राहुल देशपांडे, सलील कुलकर्णी, आनंद भाटे, प्रभा अत्रे, संजीव अभ्यंकर, ऋषिकेश रानडे.