loading...

लेखिका कृष्णा सोबती यांना ज्ञानपीठ पुरस्कार 2017 जाहीर

loading...
लेखिका कृष्णा सोबती यांना 'जिंदगीनामा' या कादंबरीसाठी १९८० चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. तर १९९६मध्ये अकादमीची साहित्य अकादमी फेलोशिप देऊनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. याबरोबरच कृष्णा सोबती यांचा हिंदी अकादमी, दिल्लीने २०००-२००१ या वर्षीचा शलाका पुरस्कार देऊन सन्मान केला होता..

१८ फेब्रुवारी १९२५ला कृष्णा सोबती यांचा पाकिस्तानातील गुजरात शहरात जन्म झाला. 

कृष्णा सोबती यांच्या 'मित्रो मरजानी', 'डार से बिछुरी', 'सूरजमुखी अंधेरे के' या कादंबऱ्या विशेष गाजल्या. अलिकडेच त्यांच्या 'ए लडकी' या दीर्घकथेचे स्वीडनमध्ये प्रकाशन झाले होते.

कृष्णा सोबती यांची साहित्यसंपदा

> डार से बिछुड़
> मित्रो मरजानी
> यारों के यार
> तिन पहाड़
> बादलों के घेरे
> सूरजमुखी अंधेरे के
> ज़िन्दगी़नामा
> ऐ लड़की
> दिलोदानिश
> हम हशमत
> समय सरगम

1) साहित्य क्षेत्रातील अत्यंत सन्मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हिंदी भाषेतील प्रख्यात लेखिका कृष्णा सोबती यांना जाहीर झाला आहे. 

2) साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

3) ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

4) १९८० मध्ये ‘जिंदगीनामा’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

5) १९९६ मध्ये साहित्य अकादमीची फेलोशिपही त्यांना मिळाली. कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या ‘जिंदगीनामा’, ‘ऐ लडकी’, ‘मित्रो मरजानी’ यांसारख्या अनेक कादंबऱ्या गाजल्या. 

6) हिंदी साहित्यात आपल्या लेखनाची भर घालून ती भाषा समृद्ध करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कल्पना विलास हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

7) नफिसा’, ‘सिक्का बदल गया’ ‘बादलोंके घेरे’, ‘बचपन’ या कृष्णा सोबती यांनी लिहिलेल्या लघुकथाही चांगल्याच लोकप्रिय झाल्या. 

8) २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्याबाबतही सरकारकडून विचारणा झाली होती मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला.

9) 'मित्रो मरजानी’ ही कादंबरी त्यांनी १९६६ मध्ये लिहिली. या कादंबरीत विवाहित स्त्रीच्या लैंगिक भावनांचे चित्रण होते त्यामुळे ही कादंबरी त्याकाळी चर्चेचा विषय ठरली होती.