Header Ads Widget

Ticker

4/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्य: भौगोलिक स्थिती Geographical location

ads Code paste
महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्रात तेव्हा २६ जिल्हे होते आणि ४ प्रशासकीय विभाग होते. आता महाराष्ट्रात ३6 जिल्हे आणि ६ प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी असणारे जिल्हे :
कोकण विभाग - बृहन्मुंबई,ठाणे, कुलाबा, रत्नागिरी,
पुणे विभाग - पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर,सोलापूर,नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव,
औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, बीड,परभणी,उस्मानाबाद,नांदेड,
नागपूर विभाग - नागपूर,वर्धा,भंडारा,चांदा,अमरावती,बुलढाणा,अकोला,यवतमाळ,

महाराष्ट्राचे भारतातील स्थानउत्तर गोलार्धत भारत असून पूर्व गोलार्धातील आशिया खंडातील भारत हा देश आहे .हिमालयाच्या दक्षिणेकडे अगदी हिंद महासागराकडे पसरलेला आशियाचा हा एक मोठा भाग असून यास भारतीय उपखंड असे म्हणतात. या उपखंडात भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून उत्तर भारत व दक्षिण भारतास एकत्रित आणणारी विशाल भूमी आहे.

अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय महाराष्ट्र चा अक्षांश विस्तार महाराष्ट्र चा अक्षांश विस्तार १५' ४८'उत्तर अक्षवृत्त ते २२' ६' उत्तर अक्षवृत्त असून रेखांश विस्तार ७२' ३६' पूर्व रेखावृत्त ते ८०' ५४' पूर्व रेखावृत्त आहे. आकार  - भारतीय द्विकल्पाचा एक भाग महाराष्ट्र पठार दख्खन पठार आहे. महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती असूनदक्षिणेकडे चिंचोळा तर उत्तरेकडे होत गेलेला आहे. त्याचा पाया कोकणात व त्याचे निमुळते टोक पूर्वेस गोंदियाकडेआहे.लांबी रुंदी व क्षेत्रफळ - पश्चिमेस अरबी समुद्रापासून पूर्वेस साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे. महाराष्ट्राची पश्चिम - पूर्व लांबी सुमारे ८०० कि मी असून दक्षिणोत्तर रुंदी सुमारे ७२० कि मी आहे. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ ३,०८,३४६ चौ. कि. मी. च्या खालोखाल महाराष्ट्रचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राने देशाचा ९.३६% प्रदेश व्यापलेला आहे.

नैसर्गिक सिमा
वायव्य भागात सातमाळा डोंगररांगा, गलना टेकड्या व सातपुडा पर्वतरांगेतील अक्राणी टेकड्या, उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा व त्यांचा पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत, तर ईशान्येस दर्केसा टेकड्या, पूर्वेस चिरोळी टेकड्या, गायखुरी व भामरागड डोंगर या नेसर्गिक सिमा निर्माण करतात.दक्षिनेतर पठारावर हिरण्यकेशी नदी, व कोकणात तेरेखेल नदी तर पश्चिमेस अरबी समुद्र अशा महाराष्ट्राच्या नेसर्गिक सीमा आहेत.

राजकीय सीमा व सरहद्दीमहाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य आणि दादरा नगर हवेली हे संघराज्य क्षेत्र आहे.उत्तरेस मध्य प्रदेश,पूर्वेस छत्तीसगढ तर आग्नेय आन्ध्र प्रदेश या राज्यांचा सीमारेषा आहेत. दक्षिणेस कर्नाटक व गोवा हीराज्ये आहेत. पश्चिमेस अरबी समुद्र आहे.


महाराष्ट्राच्या सरहद्दीवायव्य भागात गुजरात राज्याला ठाणे, नाशिक,धुळे,व नंदुरबार,या चार जिल्हाच्या सीमा भिडतात.केद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीशी ठाणे जिल्ह्याची सरहद आहे. उत्तरेकडे मध्य प्रदेशनंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा,अमरावती,नागपूर,भंडारा,व गोंदिया,या आठ जिल्ह्यांच्या सरहद्दी आहेत. पुर्वेस छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या सरहद्दी आहेत. आग्नेयेस आंध्र प्रदेशाला गडचिरोली, चंद्रपूर,यवतमाळ,व नांदेड,या चार जिल्ह्याच्या सरहदी आहेत. दक्षिणेस कर्नाटकला सिंधुदुर्ग, कोल्हापूर,सांगली,सोलापूर,तसेच उस्मानाबाद,नांदेड,लातूर,या सात जिल्ह्यच्या सीमा आहेत. सरतेशेवटी अगदी दक्षिणेस गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद आहे.


राजकीय स्वरूपमहाराष्ट्रात १९६० साली चार प्रशासकीय स्वरूप होते. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, हे ते विभाग होत. तसेच सिंधुदुर्ग,लातूर,जालना,गडचिरोली,व मुंबई उपनगर असे ५ जिल्हे निर्माण करण्यात आले.

प्रथम रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन सिंधुदुर्ग तर चंद्रपूर मधून गडचिरोली, औरंगाबाद मधून जालना, उस्मानाबाद मधून लातूर, तर मुंबई मधून मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण झाला.

१ जुलै १९९८ मध्ये धुळे मधून नंदुरबार, व अकोला मधून वाशीम हे जिल्हे निर्माण झाले.

१ मे १९९९ मध्ये परभणी मधून हिगोली तर भंडारा मधून गोंदिया,

तर आता १ अगस्ट २०१४ मध्ये ठाण्यातून पालघर हा ३६ वा जिल्हा निर्माण केला.

तसेच महाराष्ट्रात २६ महानगरपालिकाआहेत. त्या पुढीलप्रमाणे 
मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुबई, मीराभाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, निजामपूर, अमरावती, नागपूर, अकोला, चंद्रपूर, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर सांगली कुपवाड, नांदेड-वाघाला, औरंगाबाद, परभणी, लातूर, जळगाव, पिंपरी-चिंचवड, धुळे,आहेत.