शब्द सिंद्धी

संस्कृत भाषेतून जसेच्य तसे म्हणजे शब्दांच्या रुपात काहीही बदल न होता मराठी भाषेत आलेले शब्द  त्यांना तत्सम शब्द म्हणतात .

तत्सम शब्द :
तिथी , पिंड, मंत्र , प्रीत्यर्थ , उपकार , घंटा , अभिषेक , भोजन , समर्थन , नैवेध्य, निस्तेज , दर्शन , सूर्य , कलश , पत्र , निर्माल्य , शिखर , देवर्षि , अब्ज , पुण्य, संगती , प्रकाश , नयन , उमेश , स्वल्प , प्रातःकाल , वाडः निश्चय, आकाश , सुत्र,गणेश , वृद्ध , विद्वान , गायन , भोजन,  बुद्धि, श्राद्ध , जगन्नाथ , स्वामि , घृणा , दंड , उत्तम , पाप , कार्य , सभ्य , संसार, कविता , अश्रु , यद्यपि,कवि   , मधु , गुरु , पिता , पुत्र , कन्या, वृक्ष, पुरुष , धर्म , सत्कार , समर्थन , उत्सव , पुष्प , जल , प्रीति , भीति , कर , ग्रंथ, पृथ्वी , भूगोल , विद्वान , भगवान , परंतु , यद्यापि , यथामति , कर्ण , पर्ण , अरण्य, हस्त , मस्तक , कर्म , ओठ  , अग्नि, नदी , कलम , मंदिर , राजा , होम ,महर्षि , प्रसाद ,सन्मति , तारा  , दुष्परिणाम , संत , गंध , तट्टिका , देवालय.

तद्भव शब्द :
संस्कृतमधून  मराठीत येताना ज्या शब्दांच्या रुपात बदल झाला आहे त्यांना तद्भव शब्द म्हणतात.
खाली काही तद्भव शब्द दिले आहेत
गृह-घर, ग्रास-घास, अज्ञानी-अडाणी, धुम्र-धूर, कोमल-कोवळा,कर्ण-कान,दीप-दिवा, मर्कट-माकड, स्वस्रू-सासू, अंध-आंधळा, पय-पाणी, तक्र-ताक, भ्राता-भाऊ,मुल-मूळ, तृण-तन, अग्नी-आग,
उद्यम-उद्योग, पंक-पंख, हस्त-हात, ग्राय-गाय, श्वसुर-सासरा, अश्रू-आसू, कंटक-काटा, पेटिका-पेटी, पर्ण-पान, चक्र-चक, पाद-पाय, अंजुली-ओंजळ, क्षेत्र-शेत,दुग्ध-दुध, विनति -विनंती, शीर्ष-शिर. इत्यादी…

देशी शब्द :
जे शब्द मूळ महाराष्ट्रातील रहिवाश्यांच्या बोलीभाषेतील मानले जातात त्यांना देशी शब्द म्हणतात.
घोडा, गार, धोंडा, ढेकुण, ओटा, पोट, लाकूड, डोके, झोप, लुगडे, वांरो, उनाडकी, अबोला, झाड, डोंगर, रेडा, पोरकट, लुट, फटकळ, खुळा, ओटी, अंघोळ, रोग, दगड, कंबर, उडी, ओढा, डोळा, पीठ, शेतकरी,चोर, अवकळा, चिमणी, धपाधप, वारकरी, लाजरा, बोका, आजार, मळकट, वेडा, गुडघा, धड.

परभाषीय शब्द :

१) कानडी :
भाकरी, किल्ली, चिमटा, काका, तूप, चाकरी, दाभण, टाळू, कुंची,तंदूर, गाजर, गादी, कांबळे, आई, नथ, खिडकी, अक्का, रजई, बांगडी, गच्ची, अन्ना, चिंधी, तांब्या,ताई, अडकित्ता, चिंच, हंडा, बांबू, खलबत्ता, खोबरे, उडीद, चीर्गुत, विळी, कणिक, पाट, अप्पा, गुढी, उत्तपा, गाल.

२) गुजराती : दादर,घी, शेट, रिकामटेकडा.

३ )इंग्रजी :
एजंट, टेबल, बस, डॉक्टर, सायकल, रेडीओ, टेलिफोन,सिनेमा, सर्कस, फाईल, स्टेशन, मास्तर, पार्सल, बॅट, बॉल,

४) हिंदी : दिल, करोड, दाम, बात, भाई, और, बच्चा, मुहावरा, नानी, इमली.

५) फारसी :
रवानगी, लेजीम, शादी, जबरी , मेवा , मिठाई , कागद, सरकार, पंज, हप्त,शाबास, गप, खबर्दार,खाशी, फौज, बारगीर, शिलेदार, लष्कर,स्वार, गोलंदाज, जिरेटोप, शहनाई, जलसा, सामान ,हजार, अव्वल, दिगर, निमे, हमेशा, सबब, अगर, लेकीन, की, वाह,हकीकत ,सरकारी, गुजराण,शाहीर,रियाज, शाई, खलिता,कलम, अबकारी, जरतारी, कुमक, अत्तर , अब्रू , अक्कल , हुशारी , मस्ती, डावपेच ,  किताब, जाब, शफत, तनखा,कारभार,खुलासा, दरबार, पेशवा ,पोशख , सौदागर , कामगार , गुन्हेगार, फडनविस , दिरंगाई, खाना, पैदा, बाग, बगीचा, मशीद, महिना,मोहोर, मेणा, रसद, जीन, तोफ, समशेर, तंबू, शामियाना,लगाम,मेख, खंदक, बुरुज, किल्ला, इमारत, पगडी, मखमल, चादर,रजई, खुर्ची, मेज, पलंग, तबक, समई,पानदान, अगरबत्ती, अंगूर,खसखस, खिसमिस, पिस्ता, बदाम, अफू, खरबूज, ढोल, दिलरुबा,नगारा,नौबत, शरमिंदा , नोकरी , गजल , दीवानखाना , गुलाब , बारदान , गलीचा , बाजार , जुलुम

६) पोर्तुगीज :
बटाटा, तंबाखू, घमेले,  पगार,बिजागिरी, कोष्टी,फणस, हापूस,पायरी, कोबी, मेज, लोणचे, बिस्कीट.

7) अरबी :
मेहनत, हुकुम, खर्च, मंजूर, जाहीर, इनाम, उर्फ, अर्ज, मनोरा, बाद, मुदत, बदल, ऐनजमाबंदी, ऐनहंगाम, ऐनआमदनी.

8)तामिळी : चिल्लीपिल्ली, सर, मठ्ठा.

9) तेलगु : अनारसा, किडूक-मिडूक, ताळा, शिकेकाई.

eMPSCkida%2Blogo%2Bcopy