गुणाकार ही गणिती प्रक्रिया थेट शिकण्याआधी तिची
व्युत्पत्ती कशी झाली हे
समजाऊन घेणे अतिशय गरजेचे आहे. गुणाकार म्हणजे बेरीज हे सूत्र आधी
लक्षात ठेऊ. गुणाकार म्हणजे बेरीज हे कसे काय ते समजावून घेण्यासाठी खालील
उदाहरण घेऊ.
मुक्ता रोज दोन लाडू खाते. तर चार दिवसात ती
किती लाडू खाईल? हे गणित आपण 2 + 2 + 2 + 2 = 8 असे सोडवू. किंवा दुसरे
उदाहरण पाहू. एका गोठ्यात 8 गायी असतील तर त्यांच्या पायांची एकुण संख्या
किती असेल? हे गणित आपण 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4 + 4 = 32 असे सोडवू, एका
गाईला चार पाय व अशा आठ गायी असा विचार करुन आपण हे उत्तर काढले.
दोन संख्यांचा गुणाकार करण्याची एक पद्धत आवडायची. त्याचं नाव आहे 'गणेश
गुणाकार'. दोन कितीही आकडी संख्यांचा गुणाकार या खूप सोप्या पद्धतीने खूप
जलद करता येतो. तर पाहूया कसा करायचा हा गणेश गुणाकार
