Lasavi and masavi - लसावी व मसावी

महत्वाची सूत्रे

 • पहिली संख्या * दुसरी संख्या  = ल. सा. वि. * म. सा.वि 
 • पहिली संख्या = मसावि * लसावि / दुसरी संख्या 
 • दुसरी संख्या  = मसावी * लसावि / पहिली संख्या 
 • मसावि =  पहिली संख्या * दुसरी संख्या / लसावि 
 • लसावि = पहिली संख्या * दुसरी संख्या / मसावि 
 • लसावी / मसावी = असामायिक अवयवांचा गुणाकार 
 • मोठी संख्या = मसावि * मोठा असामायिक अवयव 
 • लहान संख्या = मसावि * लहान असमायिक अवयव 
सोडवलेली उदाहरणे :
प्रश्न  १ : दोन संख्यांचा मसावि १५ व लसावि २२५ आहे , एक संख्या ७५ असल्यास दुसरी संख्या काढा?
 1. २५   
 2. ३५
 3. ४५
 4. ५५
उत्तर : 
सूत्र : पहिली संख्या * दुसरी संख्या  = ल. सा. वि. * म. सा.वि 
दुसरी संख्या  = मसावी * लसावि / पहिली संख्या
दुसरी संख्या  = १५ * २२५ / ७५
                     = ४५

प्रश्न २ : दोन संख्यांचा मसावी ३ व लसावि १०५ आहे तर , त्यापैकी लहान संख्या काढा?
 1. १५
 2. २१
 3. २५
 4. १८
उत्तर : 
सूत्र १ : लसावी / मसावी = असामायिक अवयवांचा गुणाकार 
         १०५ / ३ = असामायिक अवयवांचा गुणाकार 
               ३५ = असामायिक अवयवांचा गुणाकार 
           ७ * ५ = असामायिक अवयवांचा गुणाकार 
सूत्र २ : लहान संख्या = मसावि * लहान असमायिक अवयव 
            लहान संख्या = ३ * ५ = १५
सूत्र ३ :मोठी संख्या = मसावि * मोठा असामायिक अवयव 
          मोठी संख्या = ३ * ७ = ३५

Lasavi and masavi - लसावी व मसावी
आमच्या  YouTube चॅनेलवरचे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.