loading...

रोमन संख्यां

loading...
 1. रोमन संख्यांमध्ये दशमान पध्दतीचा थेट वापर केला जात नाही. रोमन संख्यापध्दतीमध्ये 0 ला स्थान नाही.
 2. रोमन संख्यापध्दतीमध्ये खालीलप्रमाणे खुणा वापरल्या जातात. (निळ्या रंगानी दर्शविलेल्या खुणाच सामान्यपणे परीक्षेतील उदाहरणांमध्ये वापराव्या लागतात)
 3. रोमन संख्यापध्दतीतील खुणा
  खुण किंमत
  I 1
  IV 4
  V 5
  IX 9
  X 10
  XL 40
  L 50
  XC 90
  C 100
  CD 400
  D 500
  CM 900
  M 1000
  1 ते 20 संख्यांचे रोमन रुपांतर
  संख्या रोमन
  1 I
  2 II
  3 III
  4 IV
  5 V
  6 VI
  7 VII
  8 VIII
  9 IX
  10 X
  11 XI
  12 XII
  13 XIII
  14 XIV
  15 XV
  16 XVI
  17 XVII
  18 XVIII
  19 XIX
  20 XX
 4. रोमन संख्यांमध्ये 1, 10, 100 या संख्यांसाठीच्या खुणा लागोपाठ तीनदा येउ शकतात, म्हणजे त्या खुणेच्या तिपटीपर्यंतच्या संख्या त्या खुणेच्या वापरातून लिहिता येतात. उदा. 3 = III, 30 = XXX, 300 = CCC.
 5. 1, 10, 100 या संख्यांसाठीच्या खुणांची चौपट लिहायची असल्यास त्याखुणेपुढे सारणीतील पुढील खुण येते. उदा. 4 = IV, 40 = XL, 400 = CD.
 6. 5, 50, 500 या संख्यांच्या खुणा लागोपाठ दोनदा येउ शकत नाहीत.
  अधिक मोठ्या संख्या
 7. 2145  = (2 × 1000) + (1 × 100) + 40 + 5 = MMCXLV
 8. 890  = (500 × 1) + (3 × 100) + 90 = DCCCXC
 9. 465 = 400 + 50 + 10 + 5 = CDLXV
 10. 120 = 100 + (2 × 10) = CXX