loading...

तलाठी महा भरती 2019 ची तयारी कशी करावी ?

loading...

तलाठी भरतीची तयारी कशी करावी ?


मराठी व्याकरण :
मराठी विषयाचा अभ्यास करताना मराठी व्याकरण हा शब्दधन हे दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत. मो.रा. वाळेबे हे मराठी व्याकरणाचे पुस्तक वारंवार अभ्यासले असता परीक्षेत याचा फायदा होतो. मराठी विषयातील शब्दधन याचा अभ्यास 7 वी स्काॅलरशीप या पुस्तकातून तसेच मार्केटमधील शब्दधन या पुस्तकातून चांगल्या प्रकारे करता येते. मराठी विषयातील तुलनात्मक प्रश्न अलीकडे परिक्षेत विचारली जात आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करताना अडचणी येत आहेत. या विषयाचा नियमीत सराव नसेल तर सहज सोपे वाटनारे प्रश्नही परीक्षेत चुकतात. मागील दहा वर्षातील लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास उपयुक्त ठरते.

इंग्रजी व्याकर  :
या विषयाची समस्या महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आहे. परंतु हा विषय दुर्लक्षित केल्यामुळे परिक्षेतील कट आ‍ॅफ लिस्टवर परिणाम होतो. इंग्रजी व्याकरण या विषयाचा नियमीत सराव केल्यास व्याकरणावरील खुप चांगले गुण मिळवता येतात. यासाठी बाळासाहेब शिंदे या पुस्तकाचा खूप उपयोग चांगला होतो. मला हा विषय खुप अवघड जातो किंवा जमत नाही असे समजून या विषयाकडे पाहत असाल तर या विषयाची तयारी होउ शकत नाही. त्यामुळेे विद्यार्थ्याने या विषयाची तयारी केल्याशिवाय मला परिक्षेत यश मिळणार नाही त्यामुळे हा विषय मी खूप चांगल्या प्रकारे समजून परिक्षेत यश मिळणार आहे अशी मानसिक तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे.

अंकगणित व बुध्दिमत्ता :
मूलभूत संकल्पना यावर आधारित कमीत कमी वेळामध्ये उत्तर देता येणारी प्रश्ने परिक्षेत विचारली जातात. वरील अभ्यासक्रम वाचला असेल तर यानंतर त्यांनी मागील दोन वर्षातील पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, लिपीक या परिक्षेच्या विचारण्यात आलेंल्या प्रश्नपत्रिका पहाव्यात व त्या नियमीत सराव करावा. अंकगणित व बुध्दिमत्ता हे घटक परिक्षा कक्षात वेळेत सोडवता आले तर याचा फायदा आपणास संपूर्ण पेपरमध्ये होतो. अन्यथा गोंधळ होतो

सामान्य ज्ञान :
सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास कारतानाएकनाथ पाटील लिखित सामान्य ज्ञान PSI, STI, ASST ठोकळा याचा अभ्यास करणे उपयुक्त ठरते. यामधील  भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी व आपण ज्या पदाची परीक्षा देत आहात त्या परिक्षेसंबंधी तांतत्रिक प्रश्न व ज्या जिल्ह्यात (जिल्हा विशेष) आपण परिक्षा देत आहात त्या ठिकाणची परिसर माहिती याचा समावेश सामान्य ज्ञान या घटकामध्ये येतो. सामान्य ज्ञान हा घटक मागील प्रश्नपत्रिकेला विचारात घेतल्यास योग्य नियोजन पध्दतीने करता येतो.